Advertisement

“मुख्यमंत्री कधीही राठोडांची हकालपट्टी करू शकतात, मग ही सर्व नाटकं कशासाठी ?”

मुख्यमंत्र्यांना मंत्र्याचा राजीनामा येण्याची वाट बघण्याची गरज नाही. ते कधीही मंत्रीमंडळातून त्यांची हाकालपट्टी करू शकतात.

“मुख्यमंत्री कधीही राठोडांची हकालपट्टी करू शकतात, मग ही सर्व नाटकं कशासाठी ?”
SHARES

वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) अधिवेशनापूर्वी राजीनामा देणार, असा कांगावा मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमातून केला आहे. मात्र हा केवळ आपल्या सुसंस्कृतपणाचा बुरखा टिकवण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आहे. मुख्यमंत्री कधीही त्यांची हकालपट्टी करू शकतात, मग ही सर्व नाटकं कशासाठी? असा प्रश्न भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अतुल भातखळकर म्हणतात, वनमंत्री संजय राठोड हे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजीनामा देणार या मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमात आणि प्रसारमाध्यमात पेरलेल्या बातम्या म्हणजे आपला सुसंस्कृतपणा टिकवण्याचा एक निलाजरा प्रयत्न आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, एवढंच या मागचं लाॅजिक आहे.

मुख्यमंत्र्यांना मंत्र्याचा राजीनामा येण्याची वाट बघण्याची गरज नाही. ते कधीही मंत्रीमंडळातून त्यांची हाकालपट्टी करू शकतात. परंतु केवळ सुसंस्कृतपणाबुरखा पांघरण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जोपर्यंत संजय राठोड राजीनामा देणार नाही, तोपर्यंत भाजप अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा देखील अतुल भातखळकर यांनी दिला आहे. 

हेही वाचा- “मी निर्णय घेण्याआधी तूच निर्णय घे”, संजय राठोड यांचा राजीनामा निश्चित?

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) चांगलेच नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे. एवढंच नाही. तर त्यांनी सूचक शब्दांत राठोड यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचीही चर्चा सुरू आहे. 

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे राठोड यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राठोड यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी केलेली असल्याने राठोड यांचा राजीनामा घेऊन विरोधकांच्या हल्ल्याची धार कमी करता येऊ शकते, असं काही मंत्र्यांचं मत आहे.

(bjp mla atul bhatkhalkar criticized maharashtra cm uddhav thackeray on sanjay rathod resignation)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा