Advertisement

नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा, नितेश राणेंची मागणी

सध्या नोटांवरील फोटोवरून राजकीय मंडळी वेगवेगळे विधान करत असून, त्यात आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील उडी घेतली आहे.

नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा, नितेश राणेंची मागणी
SHARES

सध्या नोटांवरील (Note) फोटोवरून राजकीय मंडळी वेगवेगळे विधान करत असून, त्यात आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील उडी घेतली आहे. "नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटा हवा" अशी मागणी राणे यांनी केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. "ये परफेक्ट है" असे म्हणत राणे यांनी नोटवर शिवाजी महाराजांचा असलेला फोटो शेअर केला आहे.

भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो छापा, अशी अफलातून मागणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली. त्यानंतर नितेश राणे यांनी महाराष्ट्रातून शिवरायांच्या फोटोंची मागणी केली आहे.

'लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते, तर गणपती विघ्नहर्ता आहे. आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही. किमान नवीन नोटांवर ही सुरुवात तर भारतीय अर्थव्यवस्था रूळावर केली जाऊ शकते, असे केजरीवाल म्हणाले.

इंडोनेशियात 85 टक्के मुस्लीम आणि केवळ दोन टक्के हिंदू आहेत. मुस्लीम राष्ट्र असूनही तिथल्या नोटांवर गणपतीचे छायाचित्र असल्याचेही ते म्हणाले.

भारताला विकसित आणि समृद्ध देश म्हणून ओळख मिळवावी अशी देशवासियांची इच्छा आहे. परंतु, आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक टप्प्यावर आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले.

केजरीवाल हे धर्माची नशा विकण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यात आणि मोदींमध्ये फारसा फरक नाही. चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नाही? असा सवाल काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे.



हेही वाचा

काही जागांवर शिंदे गटासोबत तर काही जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे करणार अयोध्या दौरा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा