नाथाभाऊंनी घेतला विनोद तावडेंचा क्लास

  Vidhan Bhavan
  नाथाभाऊंनी घेतला विनोद तावडेंचा क्लास
  मुंबई  -  

  माजी मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा अक्षरश: क्लास घेतला. 'मंत्री असून एसआयटीची शिफारस काय करता? ठोस निर्णय घ्या. कसले सरकार आहे? चौकशी समिती नेमली होती, चौकशी समितीचा अहवाल आलेला आहे. मग एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय का घेतला जात नाही?', असा सवाल करत एकनाथ खडसे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना धारेवर धरले.

  एकनाथ खडसे यांनी शालेय पोषण आहार वितरणाच्या व्यवहारातील घोटाळ्याबद्दल राज्य सरकार काय पाऊल उचलत आहे, अशी विचारणा केली होती. शालेय पोषण आहार साहित्य पुरवण्यासाठी काही ठराविक ठेकेदारांनाच काम दिले जाते. ई- टेंडरिंग करूनही त्याच ठेकेदारांना टेंडर का मिळते? असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला.

  अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मागच्या आठवड्यात एकनाथ खडसे यांनी दोन मंत्र्यांना फैलावर घेतले होते. एमआयडीसी जमिनीबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई तर वीजेबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांनी धारेवर घेतले होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.