मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चक्क त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरीचा विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याने या निर्णयाचं राणे यांनी स्वागत केलं आहे.
हेही वाचा- वृक्षतोडीसाठी मेट्रो प्रकल्प आखलेला नाही, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना खडसावलं
मेट्रोच्या आरे कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यावर असे आदेश नाणार रिफायनरीचा विरोध करणाऱ्या आंदोलकांच्या बाबतीतसुद्धा घ्या असं आवाहन आ. नितेश राणे ट्विटरद्वारे केलं होतं.
आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतले!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 1, 2019
आता नाणार आंदोलनाचे केसेस पण परत घ्यावेत..
ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते..
या संदर्भातील सकारात्मक निर्णय घेतल्यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, शिवसेनेचा मंत्री असतानाच नाणारमधील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेऊन आपल्या मंत्र्यांची चूक सुधारली आहे. याचप्रकारे यापुढंही ट्विटला प्रतिसाद मिळावा.