Advertisement

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना ‘या’ शब्दांत दिल्या ‘व्हॅलंटाईन डे’च्या शुभेच्छा!

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चक्क जुनं प्रेम असलेल्या शिवसेनेला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘व्हॅलंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना ‘या’ शब्दांत दिल्या ‘व्हॅलंटाईन डे’च्या शुभेच्छा!
SHARES

‘व्हॅलंटाईन डे’ जवळ आल्यामुळे प्रेमी जोडपी भेटवस्तूची देवाण-घेवाण करत एकमेकांना खूष करताना दिसत आहे. अशा भारलेल्या वातावरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चक्क जुनं प्रेम असलेल्या शिवसेनेला (shiv sena) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘व्हॅलंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नाही, यानिमित्ताने त्यांना खास गिफ्ट देखील पाठवलं आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय नेते अमित शहा यांच्या सिंधुदुर्गातील झंझावाती दौऱ्यानंतर देखील नितेश राणे आमदार असलेल्या मतदारसंघातील वैभववाडी येथील काही भाजप (bjp) नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर जात असल्याची बातमी फिरत आहे. याबद्दल नितेश राणे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देतानाच नितेश राणे यांनी शिवसेनेला प्रेम संदेश देखील दिला. 

हेही वाचा- राज्यपाल न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत- अजित पवार

आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलेल्या व्हिडिओतून नितेश राणे म्हणतात, वैभववाडी नगरपंचायतीतील काही आमचे नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी मी ऐकली आणि वाचली आहे. ‘व्हॅलंटाईन डे’ काही दिवसांवर आला आहे. शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे आणि जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं हे सगळेजण म्हणतात. वैभववाडी नगरपंचायतीची परिस्थिती पाहिली, तर त्यांच्याकडे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे करायला मूळ शिवसैनिक देखील उरलेले नाहीत, अशी परिस्थिती आहे.

शिवसेना पक्ष हा हिंदूहृदयसम्रात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. साहेबांचा आदर आम्ही कालपण करत होता, आजपण करतोय आणि उद्या देखील करत राहणार. आमच्या हृदयात बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांच्या पक्षाची अशी अवस्था होऊ नये म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबिय म्हणून आमची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक ‘व्हॅलंटाईन डे’च्या निमित्ताने मी उद्धवजींकडे (uddhav thackeray) पाठवतोय. 

अजून एक बाब अशी आहे की मेडिकल काॅलेजसाठी जेव्हा राणे साहेबांनी जेव्हा रुटीन फाईलवरील सहीसाठी जेव्हा फोन केला होता. तेव्हा उद्धवजींनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मेडिकल काॅलेजची फाईल त्यांनी साईन केली. आम्ही उद्धवजींना काही देऊ शकत नाही. दिल्यावर ते स्वीकारणार नाही. गुच्छही पाठवला, तरी ते स्वीकारणार नाहीत. म्हणून हे ७ नगरसेवक आम्ही आभार मानण्यासाठी त्यांच्याकडे पाठवत आहे. ‘व्हॅलंटाईन डे’च्या निमित्ताने मी उद्धवजींना आणि शिवसेनेला मनापासून शुभेच्छा देतो. 

(bjp mla nitesh rane gives valentines day greetings to maharashtra cm uddhav thackeray and shiv sena)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा