Advertisement

सोनाली बेंद्रेला वाहिली श्रद्धांजली! राम कदम नेटकऱ्यांकडून ट्रोल

तरुणींविरोधात बेताल वक्तव्य आणि गोविंदा पथकाला दिलेली तुच्छ वागणूक यामुळे चर्चेत असलेल्या कदमांनी सोनालीला प्रथम श्रद्धांजली वाहिली आणि नंतर ही अफवा असल्याचंही म्हटलं. मागील २ दिवसांपासून आपण त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचंही कदम यांनी म्हटलं आहे.

सोनाली बेंद्रेला वाहिली श्रद्धांजली! राम कदम नेटकऱ्यांकडून ट्रोल
SHARES

भाजपाचे आमदार राम कदम यांनी पुन्हा एकदा आपल्या ‘रावणी’ बुद्धीचा परिचय आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून दिला आहे. कर्करोगावर उपचार घेत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन झाल्याचं म्हणत कदम यांनी तिला चक्क श्रद्धांजली अर्पण केली. मात्र ही अफवा असल्याची समजताचं त्यांनी लगेचं ते ट्विट डिलीट केलं. परंतू, या ट्विटनंतर काही क्षणातचं नेटकऱ्यांनी त्यांना चांगलचं ट्रोल केलं आहे.




लक्ष वळवण्यासाठी

गोकुळाष्टमीपासून सुरू असलेले प्रताप कमी पडले की काय म्हणून राम कदम यांनी ट्विटरवर सोनाली बेंद्रेला मृत घोषित करत श्रद्धांजली वाहिली. हे सर्व सध्या सुरू असलेल्या प्रकरणाकडून लक्ष वळण्याकरीता सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.


तरुणींविरोधात बेताल वक्तव्य आणि गोविंदा पथकाला दिलेली तुच्छ वागणूक यामुळे चर्चेत असलेल्या कदमांनी सोनालीला प्रथम श्रद्धांजली वाहिली आणि नंतर ही अफवा असल्याचंही म्हटलं. मागील २ दिवसांपासून आपण त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचंही कदम यांनी म्हटलं आहे.


नेटकऱ्यांनी केली धुलाई

कदमांची नशा अद्याप उतरलेली नाही, त्यांचे जुलाब थांबलेले नाहीत, कदमांचं डोकं कामातून गेलं, लक्ष दुसरीकडे वळण्याचे प्रयत्न अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हाॅट्सअप आणि इतर सोशल मीडियावर उमटत आहेत. पुन्हा एकदा नेटकरी खवळले आहेत. कदमांनी चूका करूनही त्यांची पाठराखण करणारा भाजप त्यांच्या या नवनवीन प्रतापांमुळे चांगलाच अडचणीत सापडणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.



हेही वाचा-

'विषय संपला' म्हणत भाजपाकडून कदम यांना 'माफी'?

नेटकऱ्यांनी केली राम कदमांची धुलाई



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा