Advertisement

इटलीतल्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळतं तर…

ज्या देशात इटलीतून आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळतं, तर बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून आलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील लोकांना भारतीय नागरिकत्व का मिळू नये?

इटलीतल्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळतं तर…
SHARES

ज्या देशात इटलीतून आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळतं, तर बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून आलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील लोकांना भारतीय नागरिकत्व का मिळू नये? अशा शब्दांत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून (CAA) काँग्रेसला टोला लगावला.

‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ कायद्याला विरोध करत ईशान्येकडील राज्यांतील रहिवासी रस्त्यावर उतरले. सर्वत्र जाळपोळ आणि हिंसाचार उसळला. पोलिसांच्या गोळीबारात काहीजणांचा मृत्यूही झाला. हळूहळू दिल्ली, हैदराबाद, लखनऊ इ. शहरांमध्येही या कायद्याविरोधातील आंदोलनाचं लोण पसरलं. मुंबईतील आॅगष्ट क्रांती मैदान इथं झालेल्या आंदोलनासह महाराष्ट्रातही जागोजागी पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते, पक्ष, तरूण-तरूणी विद्यार्थी या कायद्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा- ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबरला?

ते म्हणाले, काही नेते स्वार्थासाठी या कायद्याबाबत संभ्रम निर्माण करत आहेत. तिहेरी तलाकचा निर्णय झाला, तेव्हाच या लोकांच्या पोटात दुखू लागलं. त्यानंतर ३७० कलम आणि राम मंदिरचा मुद्दा निकाली निघाल्यावरही यांचं पोट दुखतच होतं. मत मिळवण्यासाठी काही लोकं कितीही खालच्या थराला जाण्यासाठी तयार असतात. ज्यांना आपला देश ५ ट्रिलियन डाॅलरची अर्थव्यवस्था होऊ नये, असं वाटतं तेच लोकं या कायद्याला विरोध करत असल्याचा दावा त्यांनी केला.

या कायद्यांतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील अत्याचारग्रस्त अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्यात येणार आहे. यामुळे भारतातील कुणाचंही नागरिकत्व धोक्यात येणार नाही. एकाही भारतीयाचं नागरिकत्व धोक्यात आलं तर सर्वात पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा मी देईन, असंही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा- हा तर अधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रकार, अजित पवारांना क्लीन चीटप्रकरणी फडणवीसांचा आरोप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा