Advertisement

शेतकरी कर्जमाफीसाठी सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी


शेतकरी कर्जमाफीसाठी सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी
SHARES

मुंबई - विधानसभेमध्ये गुरुवारी वेगळेच चित्र पहायला मिळालं. एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसतात, मात्र आज सत्तेतील शिवसेना आणि भाजपाचे आमदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विधानसभेत गदरोळ झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, अशा घोषणा शिवसेना आमदारांनी दिल्या. तसेच यावेळी भाजपाच्या आमदारांनीही शेतकरी कर्जमुक्तीची मागणी केली. 

भाजपा आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी कर्जमुक्तीची मागणी केली आहे. दरम्यान स्वत:च्या बँकेच्या फायद्यासाठी, बोगस शेतकऱ्यांसाठी विरोधी पक्षाचे नेते शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी यावेळी केला.

दरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी गुरुवारी विधानसभेत शेतकरी कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्यासाठी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात आली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा