Advertisement

स्वातंत्र्याच्या लढाईत ख्रिश्चन इंग्रजांच्या बाजूने, खासदार गोपाळ शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य


स्वातंत्र्याच्या लढाईत ख्रिश्चन इंग्रजांच्या बाजूने, खासदार गोपाळ शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य
SHARES

भारतातील ख्रिश्चन हे मूळचे ब्रिटीश होते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढाईत ते इंग्रजांच्या बाजूने होते. त्यांचा या लढ्यात कुठलाच सहभाग नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी भाजपा पक्षश्रेष्ठींनी चांगलीच खरडपट्टी काढल्याने नाराज झालेले शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे.


कुठे केलं अक्षेपार्ह वक्तव्य?

मुंबईतील मालवणी परिसरातील शिया कब्रस्तान कमिटीमार्फत रविवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना शेट्टी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शेट्टी यांच्या विधानावर चांगलीच चर्चा सुरू झाली.



नेमकं काय म्हणाले शेट्टी?

भारतातील ख्रिश्चन हे मूळचे ब्रिटिश होते. त्यामुळे त्यांनी स्वातंत्राच्या लढाईत सहभाग घेतला नव्हता. याउलट देशातील हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी लढा तर दिलाच पण या लढाईत विजय देखील मिळवला. कारण या लढ्यात दोन्ही धर्मियांचे लोक हिंदू-मुस्लिम म्हणून नाही, तर हिंदुस्थानी म्हणून लढले.


पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया नाही


खा. गोपाळ शेट्टी यांनी केलेलं वक्तव्य ही पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया नाही. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांचं सारखंच योगदान आहे. सर्वांनी जाती-धर्माचा भेद बाजूला ठेवून एकत्रितपणे लढा दिला.
-आ. आशिष शेलार, मुंबई भाजपाचे अध्यक्ष

या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील म्हणाले, "वादग्रस्त वक्तव्य करण्याचा शेट्टी यांचा हातखंडा आहे. यापूर्वीही त्यांनी आत्महत्या करणं ही शेतकऱ्यांची फॅशन होऊन बसल्याचं अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा"



वाणीस्वातंत्र्य महत्त्वाचं

पक्षश्रेष्ठींनी सुनावल्यावर मला पदापेक्षा वाणी स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं. माझ्यावर पक्षाकडून कारवाई होण्याआधी मी माझा निर्णय जाहीर करेन. वाणी स्वातंत्र्यावर गदा आणणारं पद मला नको आहे, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.

शेट्टी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जेनेट डिसुजा शेट्टी यांच्या बोरीवलीतील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.



हेही वाचा-

अखेर सिडको जमीन विक्री व्यवहाराला स्थगिती!

हिंमत असेल तर शासकीय वसाहतीतील रहिवाशांना बाहेर काढून दाखवाच– राज ठाकरे



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा