Advertisement

हिंमत असेल तर शासकीय वसाहतीतील रहिवाशांना बाहेर काढून दाखवाच– राज ठाकरे


हिंमत असेल तर शासकीय वसाहतीतील रहिवाशांना बाहेर काढून दाखवाच– राज ठाकरे
SHARES

गुजरातमधील लोक म्हणतात अाम्हाला बुलेट  ट्रेन नको. मग पंतप्रधानांचा बुलेट ट्रेनसाठी हट्ट का. तर फक्त मुंबईला गुजरातशी जोडण्यासाठीच बुलेट ट्रेन अाणायची अाहे, असा अारोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी भाजपावर केला. यांचा डोळा अगोदरपासूनच मुंबईवर अाहे. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्रात अाली. तेव्हापासून मुंबई ही गुजरातची जखम अाहे. ती त्यांना भरून काढायचीच. त्यासाठी तुम्हाला बाहेर काढून मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईतून संपवायचं. मग मुंबई गुजरातली जोडायची. तर ती कशी जोडायची तर बुलेट ट्रेनने जोडायची, अशा शब्दात राज यांनी भाजपावर टीका केला.  


सरकारला इशारा 

वांद्रे पूर्व  येथील शासकीय वसाहतीत अायोजीत केलेल्या सभेत राज यांनी, येथे राहणारा मराठी माणूस येथेच घर बांधून राहील. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या पुढच्या पिढ्या येथेच दिवस काढतील. एवढेच मी सांगायला अालोय, अशा शब्दात येथील रहिवाशांना दिलासा दिला. सरकारची हिंमत असेल तर तुम्हाला येथून बाहेर काढून दाखवावं असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  वांद्रे पूर्व  येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेऊन अापली व्यथा मांडली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शासकीय वसाहतीतील रहिवाशांची रविवारी सायंकाळी भेट घेतली.


मराठीचं अस्तित्व टिकवण्यासाठी अालोय

 यावेळी राज म्हणाले की, माझं लहानपण याच भागात गेलंय. जसं शिवाजी पार्क माझ्यासाठी अाहे तसंच वांद्रे पूर्वही अाहे. मी या ठिकाणी राजकारणासाठी नाही तर परिस्थिती काय अाहे हे सांगण्यासाठी अालोय. मुंबईतील मराठीचे अस्तित्व टिकवण्यासाठी अालोय. बाहेरच्या राज्यातील लोकांसाठी ह्या जागा रिकाम्या करण्यासाठीच येथील रहिवाशांना बाहेर काढायचंय. परप्रांतीय येथे येतात अाणि झोपडपट्टी वसवतात. यामध्ये अमराठी, मराठीपण बिल्डर लाॅबी झोपडपट्टी वसवण्याचं काम करतात.


एकदा राज्य हातात देऊन बघा

गुजरातमध्ये गुजरातमधील बाहेरील लोकांसाठी गुजराती कार्ड अाहे. पण महाराष्ट्रात परप्रांतीयांसाठी मराठी लोकांना डावललं जात अाहे. येथील बेहरामपाड्यात ह्यांची घुसायची हिंमत नाही अाणि तुम्हाला नोटीस पाठवतात. अापण एकत्र नाही म्हणून महाराष्ट्राची बजबजपुरी झाली अाहे  पहिले राज्य नंतर देश असा बाहेरचे लोक विचार करतात. पण  अाम्ही अामचा विचार केला की अामच्या अंगावर येतात. अाम्हाला बाहेर काढतात म्हणून राज्यात तुम्हाला कोणी रडत येताना दिसणार नाही, यासाठी एकदा राज्य माझ्या हातात देऊन बघा, असं अावाहनही राज यांनी यावेळी केलं.



हेही वाचा - 

मराठा आरक्षण सरकारच्या हातात नाही - चंद्रकांत पाटील

केंद्रीय मंत्र्यांनी अाधी नाणारवासीयांशी चर्चा करावी- सुभाष देसाई




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा