SHARE

केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना चर्चाच करायची असेल तर त्यांनी अाधी रिफायनरीमुळे बाधित होणाऱ्या नाणार ग्रामस्थांशी चर्चा करावी, अशा शब्दांत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला खडे बोल सुनावले अाहेत. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असंही देसाई यांनी अाज ठासून सांगितलं.


उद्धव ठाकरेंनी भेट नाकारणं योग्यच

नाणार प्रकल्पासंदर्भातील निर्णय हा अाम्ही विचारपूर्वक घेतला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री प्रधान यांची भेट नाकारली, हे योग्यच होते. नाणार परिसरातील २० गावं या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. त्यांच्या भावना कोण समजून घेणार? आमच्याशी बोलून काय होणार? बोलायचंच असेल तर त्या ग्रामस्थांशी बोला, अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे, असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.


अामचा विरोधच

लोकांच्या संमतीनं जमीन अधिग्रहित करावी, असं नाणारसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. तसंच ती अधिसूचनाच रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता त्यावर मुख्यमंत्र्यांना भूमिका घ्यायची आहे. केंद्र सरकारनं कितीही करार केले तरी त्यांना हा प्रकल्प नाणारवासीयांना डावलून उभा करता येणार नाही. त्याला शिवसेनेचा विरोध कायम आहे, असंही देसाई म्हणाले.


मोदींसोबतच्या बैठकीची कल्पना नव्हती

केंद्रात झालेल्या कराराची आम्हाला सूतराम कल्पना आम्हाला दिली गेली नाही. शिवसेनेला अंधारात ठेवून हा प्रकल्प लादता येईल, असं कुणाला वाटत असेल तर हा त्यांचा चुकीचा समज आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या त्या बैठकीची कल्पना अाम्हाला दिली गेली नाही. त्यामुळे मी त्या बैठकीला गेलो नाही. बिन बुलाये मेहमान, ही आमची परंपरा नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.


हेही वाचा -

नाणारवरून नाराजी, करार केलात तर भेट कशाला?-उद्धव

नाणारवरून सेना-भाजपमध्ये खडाजंगी

संबंधित विषय
ताज्या बातम्या