Advertisement

सुशांतच्या खुनाचे आरोपी गजाआड जातील, त्यात एक मंत्री असेल- नारायण राणे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेली नाही, तर तो खूनच आहे. खूनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात एक मंत्रीही असेल आणि तो यांचा मुलगा असेल.

सुशांतच्या खुनाचे आरोपी गजाआड जातील, त्यात एक मंत्री असेल- नारायण राणे
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेली नाही, तर तो खूनच आहे. खूनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात एक मंत्रीही असेल आणि तो यांचा मुलगा असेल, अशा शब्दांत भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात आपला मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना स्वतःहून क्लीनचीट दिली, आश्चर्य आहे. सीबीआयचा अंतिम अहवाल आलेलाच नसताना हे म्हणतात आमचे हात स्वच्छ आहेत. मुळात सुशांतची आत्महत्या नाही, तर तो खूनच आहे. खूनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात एक मंत्रीही असेल आणि तो यांचा मुलगा असेल, असा थेट आरोप नारायण राणेंनी केला. (bjp mp narayan rane alleges aaditya thackeray over sushant singh rajput case)

हे प्रकरण लपवण्याचा किती प्रयत्न कराल, पोलिसांचा वापर करुन स्वतःच्या मुलाला वाचवणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. सुशांतला मारलं की त्यानं आत्महत्या केली. यांत कोण कोण सामिल होतं. त्याला कशाने मारलं हे तुम्हाला लवकरच कळेल. दिशाच्या मृत्यूचं प्रकरणंही बाहेर येईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अज्ञानात राहू नये, असा इशाराही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

हेही वाचा- एक बेडूक आणि दोन पोरं.., आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राणे पितापुत्रांना बेडकाची उपमा दिली होती. एकाने आत्महत्या केली, लगेच तो बिहारचा पुत्र! त्याने आत्महत्या केली, त्यात काही काळबेरं असेल तर माझ्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या पोलिसांनी ते ही शोधून काढलं असतं. पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला. त्याच्याबद्दल गळे काढणारे तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावर चिखलफेक करायला लागलात?

महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र प्रदेश, ठाकरे कुटुंबिय, आदित्यवर चिखलफेक करायला लागलात. तोंडात शेण भरून भरून, होय मी जाणीवपूर्वक बोलतोय, तोंडात शेण भरून गोमुत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावर टाकल्या. काय झालं? आता तेच शेण आणि गोमुत्राने भरलेलं तोंड, ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा. तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही, कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत, पापी वृत्तीची माणसं आम्ही नाही आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

हेही वाचा- “स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कुणाला कधी कानाखाली तरी दिली आहे का?”


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा