Advertisement

दुबईतून धमकीचा फोन आल्याचा कांगावा ‘याच’साठी, नारायण राणेंचा दावा

सुशांत सिंह प्रकरणावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठीच दुबईतून धमकी आल्याचा कांगावा केला जात असल्याचा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला.

दुबईतून धमकीचा फोन आल्याचा कांगावा ‘याच’साठी, नारायण राणेंचा दावा
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भात सीबीआय करत असलेल्या चौकशीतून बरंच काही बाहेर येत आहे. त्यामुळे या प्रकरणावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठीच दुबईतून धमकी आल्याचा कांगावा केला जात असल्याचा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला. (bjp mp narayan rane criticises cm uddhav thackeray over sushant singh rajput case)

भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार नारायण राणे यांनी हा दावा केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं. राणे म्हणाले, मुंबई पोलिसांकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून एखाद्याला कुणी फोन काॅल केला, तो कुठून केला, हे अत्यंत सहजपणे कळू शकतं. त्यामुळे पोलिसांनी या यंत्रणेचा वापर करून तपास करावा आणि कोणाचा फोन काॅल आला होता, हे जाहीर करावं, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

हेही वाचा - Maratha Reservation: सरकारला मराठा आरक्षण कायम राखता आलं असतं, पण…

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातील मुख्यमंत्र्यांच्या समारोपाच्या भाषणावर टीका करताना राणे यांनी अनेक विधेयक चर्चेविनाच मंजूर केल्याचं सांगितलं. कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुद्देसूद भाषण करत सरकारचा फोलपणा उघड केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला उत्तर दिलं नाही. मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यातील कुठल्याही गावाचा सरपंच चांगला बोलला असता. संसदीय परंपरेला व महाराष्ट्राला शोभेल असं भाषण त्याने केलं असतं. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालत विधेयकं चर्चेविनाच मंजूर केली गेली. भविष्यात पुन्हा अधिवेशन घेण्याची वेळ आलीच. तर मातोश्रीच्या गच्चीवर तास दोन तासांचं पुढचं अधिवेशन घ्यावं, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी राज्य सरकारने नामांकित वकील नियुक्त करण्याऐवजी नात्यागोत्यातले साधे वकील नेमले. या वकिलांना राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबतची बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडता आली नाही, असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा