Advertisement

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नौटंकी- नारायण राणे

मुख्यमंत्र्यांनी अवघ्या ३ तासांत केलेला कोकणचा दौरा म्हणजे नौटंकी असल्याची टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नौटंकी- नारायण राणे
SHARES

तौंते चक्रीवादळामुळे कोकणवासियांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी नुकताच कोकणचा दौरा केला आहे. मात्र अवघ्या ३ तासांत केलेला हा दौरा म्हणजे नौटंकी असल्याची टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तौंते चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. किनारपट्टी लगतच्या रहिवाशांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला खरा, परंतु अवघ्या तीन तासांचा त्यांचा दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी पुढच्या दोन दिवसांत मदत जाहीर करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. मात्र दोन दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांसाठी ठोस रक्कम जाहीर केलेली नाही. कोकणची जनता मदतीच्या प्रतिक्षेत असताना आश्वासनानुसार दोन दिवसांत नुकसान भरपाई का नाही दिली? असा प्रश्न नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. 

हेही वाचा- गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत- देवेंद्र फडणवीस

मागच्या वेळी देखील मुख्यमंत्र्यांनी मदतीच्या नावावर कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसली होती. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर केलेली मदत लोकांना अजूनही मिळालेली नाही. त्यामुळं आधी मागची नुकसान भरपाई द्या, मग पुढचं बघू, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी देखील मागच्या वेळी जाहीर केलेली मदत अजूनही लोकांना मिळालेली नाही, असा आरोप राज्य सरकारवर केला. रायगड जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस देखील आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यातच पुन्हा हे नुकसान झाल्याने आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी कोळीबांधवांनी केली आहे. 

निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस राज्य सरकारने नुकसान भरपाईची घोषणा केली, पण त्याची पूर्तता केली नाही. वाड्याच्या वाड्या उद्ध्वस्त झालेल्या असतानाही झाडामागे ५ ते १० रुपये लोकांना मिळाले होते.  

(bjp mp narayan rane slams maharashtra cm uddhav thackeray on konkan visit after cyclone tauktae)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा