Advertisement

पालघरसाठी सेना-भाजपाची अदलाबदली; खा. राजेंद्र गावितांचा शिवसेनेत प्रवेश

पालघर पोटनिवडणुकीदरम्यान, काँग्रेसचा हात सोडून राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीत गावित यांना विजय मिळाला होता. शिवसेना भाजप युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या पारड्यात पडली.

पालघरसाठी सेना-भाजपाची अदलाबदली; खा. राजेंद्र गावितांचा शिवसेनेत प्रवेश
SHARES

पालघर पोटनिवडणुकीदरम्यान, काँग्रेसचा हात सोडून राजेंद्र गावित यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीत गावित यांना विजय मिळाला होता. शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या पारड्यात पडली. त्यानंतर मंगळवारी भाजपाचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भाजपचे माजी खासदार चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा आणि दिग्गज नेते उपस्थित होते.


गावितांना उमेदवारी

युतीच्या फॉर्म्युल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात येणार होती. परंतु अपेक्षेप्रमाणे मंगळवारी स्वत: वनगा यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं. त्यानंतर शिवसेनेने गावित यांना या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर केली. यापूर्वी पालघर मतदारसंघ शिवसेनेने मागून घेत श्रीनिवास वनगाच आपले उमेदवार असतील असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. मात्र, काही अंतर्गत घडामोडींनंतर वनगा यांनी निवडणून न लढवण्याचं जाहीर केलं. त्यानंतर गावित यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली.


विधीमंडळात जाण्याची इच्छा

वनगा यांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा आपल्याकडे व्यक्त केल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. तसंच त्यांना संसदेत पाठवण्याचा आपण शब्द दिला होता. तो कायम आहे. त्यांना विधीमंडळात काम करण्याची इच्छा असून आगामी निवडणुकीत त्यांना आमदार म्हणून पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच आपणच हा निर्णय घेतला असून सर्वांचं प्रेम पाहून आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया वनगा यांनी व्यक्त केली.


पालघरमध्ये सातारा पॅटर्न

लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातील लोकसभा जागेसाठी शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं अशीच परिस्थिती पालघर लोकसभा मतदार संघात होणार अशी परिस्थिती दिसत होती. अपेक्षेप्रमाणे भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गाविक यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ती जागा शिवसेनेच्या वाट्याला आली असली तरी उमेदवार मात्र भाजपचाच देण्यात आला.




हेही वाचा -

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरूपम यांची हकालपट्टी; मिलिंद देवरा अध्यक्षपदी

बेस्टची वीज स्वस्त होणार; तर महावितरणची कडाडणार ?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा