'लाल दिव्या' खाली अंधार

Thane
'लाल दिव्या' खाली अंधार
'लाल दिव्या' खाली अंधार
See all
मुंबई  -  

लाल दिव्याचा मोह बऱ्याचं सत्ताधाऱ्यांना मोहिनी घालत असतो. भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनाही लाल दिव्याचा मोह आवरता आलेला नाही. त्यामुळे अजूनही ते लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास करतात. त्यामुळे 'दिव्याखाली अंधार' या म्हणीचा प्रत्यय अमित शाह यांच्या बाबतीत दिसतो.

केंद्र सरकारने व्हीव्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठी लाल दिव्याच्या वापरावर बंदी घातली आहे. 1 में 2017 पासून सर्व ठिकाणी ही बंदी लागू होणार आहे. बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक मंत्र्यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढण्यामध्ये लगेच तत्परता दाखवली. राज्यातील राज्यपालांनीही आपल्या गाडीवरील लाल दिवा काढून टाकला आहे.

भाजपाचे पक्षाध्यक्ष हे कोणत्याही पदावर नसताना फक्त झेड प्लस सुरक्षा कारण असल्यामुळे अजूनही लाल दिव्याची गाडी घेऊन फिरत आहेत. त्याचाच प्रत्यय ठाण्यामध्ये आला. ठाण्यामधील वीर सावरकर यांच्यावर आधारित एका कार्यक्रमामध्ये अमित शाह प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी अमित शाह लाल दिव्याच्या गाडीतून आले. या गाडीमधून पारदर्शकतेचा पुरस्कार करणारे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.