Advertisement

गरीब मुलांना घडवणार मुंबई हवाई सफर


गरीब मुलांना घडवणार मुंबई हवाई सफर
SHARES

वरळी - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष लोकसंपर्कासाठी सरसावले आहेत. त्यात भाजपाही मागे नाही. वरळीतल्या गरीब शाळकरी विद्यार्थ्यांना मुंबईची हवाई सफर घडवण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संतोष पांडे हे वरळी विभागतल्या झोपडपट्टीतील 30 गरीब मुलांना मुंबई हवाई सफर घडवून आणणार आहेत. मात्र या निर्णयानं मुलांच्या पालकांमध्ये आरे वसाहतीत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण सुरक्षेची खात्री केल्यानंतरच मुलांना हवाई सफरसाठी पाठवण्यात येईल, असं चंद्रकांत चांदे या विद्यार्थ्याच्या पालकानं सांगितले. तर आरेतील घटना मुंबईसारख्या शहरात क्वचितच घडतात. महालक्षमी येथे हेलिपॅड आहे. अनेक मुलांना आकाशात भिरभिरणारे आणि त्यातून प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. तसंच त्यांच्या सुरक्षतेची काळजीही घेतली जाईल असं भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संतोष पांडे यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा