Advertisement

महाविकास आघाडीमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात- केशव उपाध्ये

तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवलं आणि राज्यात सरकार स्थापन केलं. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही.

महाविकास आघाडीमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात- केशव उपाध्ये
SHARES

तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवलं आणि राज्यात सरकार स्थापन केलं. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही. तेव्हा राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप महाराष्ट्रचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी केशव उपाध्ये म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. हे जरी खरं असलं तरी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं दीर्घकालीन नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे. उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतरही राज्य सरकारने दहावी, बारावी परीक्षांच्या  प्रश्नावर तोडगा काढलेला नाही. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासांत कोकणातला वादळ दौरा आटोपला, त्या मुख्यमंत्र्यांना या परीक्षांचं महत्त्व आहे की नाही हा देखील प्रश्नच आहे.

हेही वाचा- फाईल कोणत्या भुतांनी पळवली?, संजय राऊतांचा राज्यपालांना प्रश्न

महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. कोरोनाशी सामना करत असताना बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही, या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत. 

तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवलं आणि राज्यात सरकार स्थापन केले. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही. तेव्हा राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. जर राज्य सरकार परीक्षा घेणार नसेल, तर पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे? याबाबतची स्पष्टता अजूनही सरकारने दिलेली नाही.

 परीक्षा न घेण्याचा पर्याय सरकार निवडणार असेल तर ज्या-ज्या ठिकाणी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातात त्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचं काय? सरकारच्या या वेळखाऊ, धोरण लकव्यामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे याचं भान या सरकारने ठेवावं आणि  दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील केशव उपाध्ये यांनी केली.

(bjp spokesperson keshav upadhye slams maharashtra government on ssc and hsc exam)

हेही वाचा- दहावीच्या परीक्षेवर २ ते ३ दिवसांत निर्णय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा