Advertisement

पंकजा मुंडे केंद्रीय कार्यकारिणीत ? खडसे-तावडेंना पुन्हा डावललं

नव्या कार्यकारिणीत नाराज एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या नावांचा समावेश नसल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं.

पंकजा मुंडे केंद्रीय कार्यकारिणीत ? खडसे-तावडेंना पुन्हा डावललं
SHARES

मोठ्या प्रतिक्षेनंतर भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी शुक्रवार ३ जुलै २०२० रोजी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीत राज्यातील उपाध्यक्ष, महामंत्री, कोषाध्यक्ष, मंत्री इ. पदांसाठी नेत्यांची नावांची (bjp state president chandrakant patil announced maharashtra executive) घोषणा करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत नाराज एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या नावांचा समावेश नसल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं.

परंतु पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत मोठी जबाबदारी देण्यात येईल तसंच खडसे आणि तावडे निमंत्रक असतील, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेळ मारून नेली. या कार्यकारिणीत प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसून आली.

नव्या कार्यकारिणीसंदर्भात माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळ्यांशी चर्चा करून नवी कार्यकारणी बनवायची होती. परंतु कोरोना संकटामुळे कार्यकारिणी जाहीर करायला थोडा वेळ लागला. नव्या कार्यकारणीत माझ्यासोबत १२ प्रदेश उपाध्यक्ष, १२ सेक्रेटरी, ६जनरल सेक्रेटरी आणि १ कोषाध्यक्ष आहेत. 

हेही वाचा - मुंबईत दररोज फक्त ४ हजार चाचण्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालं नसलं तरी त्यांना केंद्राच्या कार्यकारणीत महत्वाची जबाबदारी देण्या येईल. भाजपाच्या नेत्या प्रीतम मुंडे आणि भाजपाच्या नेत्या रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे आणि भाजापाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे त्यांना जबाबदारी दिली, असं नाही. कारण आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

उपाध्यक्ष - राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, प्रितम मुंडे, प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, कपिल पाटील,  भारती पवार, जयप्रकाश ठाकूर

महामंत्री - सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक (संघटन)

कोषाध्यक्ष - मिहीर कोटेचा, प्रमोद जठार, नागनाथ निडवदे, संजय पुराम, राजेंद्र बकाणे, धम्मपाल मेश्राम, रक्षा खडसे, अर्चना डेहनकर, संदीप लेले, स्नेहल कोल्हे, दयानंद चोरघे, इंद्रीस मुलतानी, अमित गोरखे

तर एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे. याच यादीत नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, उदयनराजे भोसले, हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

हेही वाचा - ‘ऑपरेशन लोटस’बाबत पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा