उत्तर भारतीयांच्या मतांवर भाजपाची नजर

 Kandivali
उत्तर भारतीयांच्या मतांवर भाजपाची नजर

मुंबई - पुढच्या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. कांदिवली पूर्वेच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथील सेंट लॉरेन्स शाळेच्या मैदानात उत्तर भारतीय नागरिकांना आकर्षित करण्यासाठी बुधवारी उत्तरभारतीय स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. जास्तीत जास्त उत्तर भारतीय नागरिकांना आकर्षित करण्यासाठी भोजपुरी चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय अभिनेता खेसारी लाल यादवही निमंत्रित होते. या वेळी मुंबई महानगरपालिकेत शिवसेची सत्ता असताना आणि इतका निधी उपलब्ध असतानाही मुंबई अस्वच्छ का, असा सवाल करत मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली.

Loading Comments