मंगेश सांगळे समर्थकांचा भाजपात प्रवेश

Vikroli
मंगेश सांगळे समर्थकांचा भाजपात प्रवेश
मंगेश सांगळे समर्थकांचा भाजपात प्रवेश
मंगेश सांगळे समर्थकांचा भाजपात प्रवेश
See all
मुंबई  -  

विक्रोळी - मुंबईला माफीया मुक्त करतानाच महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणणार असल्याचे वक्तव्य खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे. कन्नमवार नगरमधील विकास कॉलेजच्या हॉलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

कांजूर येथील डम्पिंग हटविण्याचा निर्धार भाजपा सरकारने केला आहे. असे सांगतानाच या वेळी मुंबई महापालिकेत भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा दावा खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या मंगेश सांगळे यांच्या मनसेतील 80 समर्थकांनी आणि काँग्रेसच्या 20 कार्यकर्त्यांनी भाजपात या वेळी प्रवेश केला.

अॅड. राजेश ठाकूर, भारती ठाकूर, प्रतिक खैर, अमित शेट्टी, संतोष सुर्वे, प्रविण व्हराडकर, अनिल खापरे, मंगेश धावडे, दीपक महाकाळ, विनोद लव्दे, प्रथमेश सकपाळ, कल्पेश शिंदे, हिमांशू भालेराव, गणेश पसरडे, आदित्य सकपाळ, प्रबोधन कांबळे, चंद्रकांत तळगावकर, सुमित खंडे आणि किरण शर्मा आणि अनिता शर्मा आदी कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.