पालिकेवर भाजपाचाच महापौर- रावसाहेब दानवे


SHARE

वरळी - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातले सर्वच महत्त्वाचे नेते प्रत्येक विभागात जाऊन राजकीय सभा घेत असल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी वरळीच्या जिजामाता नगर येथे वॉर्ड क्रमांक 197 चे भाजपा उमेदवार नवनीत पांडे यांच्या प्रचार सभेला खासदार रावसाहेब दानवे पाटील उपस्थित होते. या वेळी बोलताना दानवे म्हणाले, या राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष ठरल्याशिवाय रहाणार नाही. 

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचाच महापौर मुंबई महापालिकेवर असेल असा विश्वासही या वेळी दानवे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेचा महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला तर भाजपाच्या जाहिरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे मागेल त्याला पाणी, चांगले रस्ते, पूरमुक्त मुंबई, मुंबईतले घनकचरा व्यवस्थापन आदी वचने भारतीय जनता पार्टीने आपल्या वचननाम्यात दिली आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या