ए वॉर्डमध्ये कमळ फुलले

  Mumbai
  ए वॉर्डमध्ये कमळ फुलले
  मुंबई  -  

  सीएसटी - सर्वात कमी उमेदवारांची संख्या असलेल्या ए वॉर्डमध्ये भाजपाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. वॉर्ड फेररचनेपूर्वी काँग्रेसचे दोघे नगरसेवक होते, आता मात्र काँग्रेसला खाते उघडता आले नाही.

  ए वॉर्डमधील 225 प्रभाग हा अनुसुचित जातीच्या महिलांसाठी राखीव होता. त्यात सुजाता सानप या 10 हजार 388 मतांनी विजय झाल्या. सानप यांच्यासमोर भाजपाच्या योजना ठोकळे या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. ठोकळे यांना 6 हजार 886 मते मिळाली. वॉर्ड क्रमांक 226 या सर्वसाधारण राखीव प्रभाग भाजपाच्या हर्षिता नार्वेकर यांनी 11 हजार 53 मतांनी आघाडी मिळवली. वॉर्ड क्रमांक 227 मध्ये मकरंद नार्वेकर यांचा 6 हजार 987 मतांनी विजय झाला आहे. या मतदारसंघात भाजपाला बहुमत मिळाले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.