Advertisement

हेच राहिलं होत! चक्क भक्तानं महाराष्ट्रात उभारलं पंतप्रधान मोदींचं मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देवाचा दर्जा देऊन चक्क त्यांचं मंदिर एका भक्तानं उभारलं आहे.

हेच राहिलं होत! चक्क भक्तानं महाराष्ट्रात उभारलं पंतप्रधान मोदींचं मंदिर
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देवाचा दर्जा देऊन चक्क त्यांचं मंदिर एका भक्तानं उभारलं आहे. पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्यानं स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारलं आहे.

पिंपरी चिंचवड इथल्या मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूर मधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता १ लाख ६० हजार रुपये खर्च आलेला आहे.

१५ ऑगस्ट २०२१ दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं आहे. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली आहे. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे पुण्यातील पहिले मंदिर आहे. परंतु देशपातळीवर देखील पहिलेच मंदिर असल्याचा दावा केला आहे. मंदिरावरून टीका केली तरी चालेल पण मोदींडकडून आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून मंदिर उभारल्याची प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली.

मुंडे हे गेल्या २० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत. पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारले हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभारण्यात आल्याचं मुंडे म्हणाले. मंदिर उभारल्यानंतर अनेक जणांनी इथं गर्दी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निस्सीम भक्त असलेल्या मयूर मुंडे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं उघडकीस आलं आहे. मयूर मुंडे यांच्या विरोधात पुण्यातीलच चतु: श्रृंगी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका ज्येष्ठ नागरिका सोबत धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.



हेही वाचा

मुंबईत शिकणाऱ्या अफगणिस्तान विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

सरकार धार्मिक स्थळे उघडत नाही, पण दारूची दुकानं उघडत; राम कदमांची सरकारवर टीका

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा