भाजपाची घराणेशाही पदाधिकाऱ्यानं आणली चव्हाट्यावर

Mumbai  -  

अंधेरी - आमदार अमित साटम यांचा मेव्हणा रोहन राठोड आणि आमदार भारती लव्हेकर यांचा भाचा योगीराज दाभाळकर यांना तिकिटे दिल्याने वॉर्ड क्र. 60 आणि 68 मधील भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते सध्या नाराज आहेत. सध्या भाजपाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्याचे राज्यस्थानी सेलचे महामंत्री राजेश मुदगल यांचा व्हिडियो व्हायरल होत आहे. भाजपाच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवला जात आहे. या व्हिडिओमुळे भाजपा आमदारांच्या नातेवाईकांना तिकीट कसे मिळाले याबाबत चर्चा सध्या सुरु आहे.

या व्हिडिओमध्ये राजेश मुदगल यांनी आमदारांच्या नेत्यांच्या नातेवाईकांवर टीका केली आहे. एका बाजूला नातेवाईकांना तिकिटे देणार नाही असे नरेंद्र मोदी सांगतात, तर दुसऱ्या बाजूला भाजपा नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांना तिकिटे वाटली आहेत. या व्हिडिओमुळे आमदार अमित साटम यांनी राजेश मुदगल यांना बोलावून व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊ देऊ नये असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नातेवाईकांना तिकिटे दिल्यामुळे भाजपाच्या काही नाराज कार्यकर्त्यांनी प्रचार करण्यास नकारही दिल्याचं बोललं जात आहे.

Loading Comments