आता आणखी टाटा एअरबस हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला (Gujrat) गेल्यामुळे पुन्हा एकदा शिंदे सरकारवरती विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. टाटा एअरबस हा तब्बल २२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे सरकारला टीकेला सामोरं जावं लागणार आहे.
खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहीये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असं ट्विट करत आदित्य यांनी उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर टीका केली आहे.
वेदांत फॉक्सकॉननंतर आता आणखी एक प्रकल्प हा गुजरातला जाणार असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. वेदांतनंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावर बसवले, असंही महेश तपासे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयशी ठरत असल्याचा हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर (भाजप) नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत, अशी टीका देखील तपासे यांनी केली.
वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल असे, मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका महेश तपासे यांनी उघडकीस आणली आहे.
हेही वाचा