Advertisement

कंत्राटं ठराविक लोकांनाच मिळतात - संदीप देशपांडे


कंत्राटं ठराविक लोकांनाच मिळतात - संदीप देशपांडे
SHARES

प्रभादेवी - मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी मनसेच्या वॉररुममधून 'फेसबूक लाइव्ह'च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी संदीप देशपांडे यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार कशा प्रकारे रोखता येईल यांसारख्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. तसेच यावेळी त्यांनी पालिकेतील कामाचे कंत्राट काही ठराविक लोकांनाच दिली जात असल्याचा आरोपही सत्ताधाऱ्यांवर केला.

संदीप देशपांडेंनी उपस्थित केलेले मुद्दे

• मुंबई महापालिकेची निविदा प्रक्रिया पारदर्शक आहे का हा मोठा प्रश्न आहे असं सांगत ती पारदर्शक नसेल तर त्याची करणं काय आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

• मुंबई महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट काही ठराविक लोकच नेहमी घेतात. गेली 20-25 वर्षे सेना भाजपाची सत्ता आहे. तसेच कंत्राटदार ही 25 वर्षे तेच आहेत.

• शालेय वस्तूंसाठी 2 वर्षांचे 200 कोटी रुपयांचे टेंडर असते. हे 200 कोटी रुपये आणि महापालिका शाळेच्या मुलांची संख्या 5 लाख आहे. म्हणजे एका विद्यार्थ्यापाठी किती रुपये खर्च केला जातो हे विचार करायला लावणारे आहे. पालिका वर्षाला एका विद्यार्थ्यापाठी 1 लाख रुपयांहून अधिक पैसे खर्च करते त्या मापाचे शिक्षण आहे का?

• विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक समिती नेमण्यात अाली होती. त्यामध्ये काही शिफारशी करण्यात आल्या होत्या. पण त्यानुसार शालेय वस्तूंचे कॉन्ट्रॅक्ट फक्त 4 ते 5 कॉन्ट्रॅक्टरलाच देण्यात आले.

• टेंडर कंडिशनमध्येच घोळ आहे. एल अँड टीसारख्या कंपन्या या रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत असतानाही एल अँड टी बाद ठरते.

• निविदा प्रक्रियेत घोळ घालणारे कोणतेच कंत्राटदार जेलमध्ये गेले नाहीत. कॉन्ट्रॅक्टरचा विचार करूनच निविदा तयार केल्या जातात.

• प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याचं काम शिवसेना भाजपानेच केलं आणि आता प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याच्या गोष्टी हे लोक करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा