चार माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला

Lower Parel, Mumbai  -  

मुंबई - महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये शिवसेनेच्या चार महापौरांचा समावेश आहे. माजी महापौर मिलिंद वैद्य 182, श्रद्धा जाधव 202, विशाखा राऊत आणि विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांचा समावेश आहे. मिलींद वैद्य प्रभाग 182 मधून, श्रद्धा जाधव प्रभाग 202 मधून, विशाखा राऊत प्रभाग 191 मधून तर स्नेहल आंबेकर प्रभाग 198 मधून निवडणूक लढवत आहेत.

या चारही महापौरांना त्यांच्या प्रभागातून कडवं आव्हान आहे. त्यामुळे त्यांनी जोरदार प्रचारही केला आहे. मात्र मतदारराजा या दिग्गजांची प्रतिष्ठा राखतो की धुळीला मिळवतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Loading Comments