कुणाला मिळणार उमेदवारी?


SHARES

घाटकोपर -  प्रभाग एक, जागा एक, पक्षही एक...पण इच्छुक उमेदवार मात्र चार..आश्चर्य वाटलं ना? पण यातला प्रभाग आहे 123, पक्ष आहे भाजप, आणि इच्छुक उमेदवार आहेत संगीता पडवळ, बबिता चौहान, हर्षदा कोदे आणि जयश्री चौघुले. हर्षदा कोदे आणि बबिता चौहान या गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाच्या कार्यकर्त्या म्हणून काम पाहतायेत..तर संगीता पडवळ आणि जयश्री चौघुले यांनी नुकतंच दोन महिन्यांपूर्वी भाजपाचं कमळ हाती घेतलंय..त्यामुळे आता या प्रभागासाठी जुन्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जातोय की नव्यानं पक्षात प्रवेश केलेल्यांना प्राधान्य याचीच चर्चा सध्या या प्रभागात सुरु आहे.

संबंधित विषय