Advertisement

६ महिन्यानंतर मुंबई पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या ६ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता आहे.

६ महिन्यानंतर मुंबई पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता
SHARES

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या ६ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ६ महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये पालिकेच्या निवडणुका होऊ शकतात.  

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं महाराष्ट्र विधानसभेत यापूर्वीच ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत असा ठराव मंजूर केला होता.

विधानभवनात जो अध्यादेश काढला आहे, त्या अध्यादेशात ज्या गोष्टी माडण्यात आल्या आहेत त्यामुळं निवडणूकांना उशीर होऊ शकतो. मात्र यामध्ये निवडणुका पुढे ढकला असे कुठेच म्हटलेलं नाही. - नितीन सरदेसाई

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर म्हणाले की "ओबीसी इम्पीरियल डेटा सादर करण्यास वेळ लागेल, यासोबतच सरकारनं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. किमान 6 महिने पालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणावर बंदी कायम असल्यानं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका किमान ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभेनं एकमतानं महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक टाउनशिप कायदा तसंच महाराष्ट्र ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कायद्यातील सुधारणांना मंजुरी दिली. ज्यामुळे राज्य सरकार नागरी निवडणुकांसाठी प्रभागांचे सीमांकन करू शकले.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा