बोगस मतदानाचे हे घ्या पुरावे...

Mumbai
बोगस मतदानाचे हे घ्या पुरावे...
बोगस मतदानाचे हे घ्या पुरावे...
See all
मुंबई  -  

देशातला सर्वात जुना राजकीय पक्ष असं बिरुद मिरवणाऱ्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे नामुष्कीला सामोरं जावं लागलं आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर न करण्याचे आदेश पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत. या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे उमेदवार सुरज सिंह ठाकुर, इमरान खान आणि अभिषेक सावंत यांनी केला आहे. यासंदर्भातला व्हिडिओ आपल्याला मिळाल्याचा या तिघांचा दावा आहे. कथित बोगस मतदानाचा हा व्हिडिओ ‘मुंबई लाइव्ह’च्या हाती लागला आहे.


8 आणि 9 जुलै रोजी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत एका गटाने गैरप्रकार केल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. तरीही काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सुरज हेगडे आणि प्रदेश रिटर्निंग ऑफीसर कुलदीप सिंगला यांनी अध्यक्षपदावर विजयी उमेदवार म्हणून गणेश यादव यांचं नाव घोषित करण्याचा प्रयत्न केला.सुरज यादव यांनी निवडणुकीत गैरप्रकार केला असल्याचा व्हिडिओ पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा करत प्रतिस्पर्धी गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. हा प्रकार पक्षाच्या हायकमांडपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी निवडणूक निकालाच्या घोषणेला स्थगिती दिली.


सुरज यादव हे माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या गटातले म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिल्यानंतरही पक्षनेतृत्वाने राजीनामा न स्वीकारल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेल्या गुरुदास कामत यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.हे देखील वाचा -

चव्हाणांच्या राज्यात पगाराची वाणडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.