Advertisement

'बविआ'चे आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश


'बविआ'चे आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश
SHARES

बोईसरमधील बहुजन विकास आघाडी पक्षाचे (बविआ) आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आमदार विलास तरे यांनी शिवबंधन बांधले. विलास तरे यांच्या पक्षप्रवेशांची चर्चा आगोदर पासूनचं सुरू होती. दरम्यान, राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत. 

शिवसेनेचा कार्यकर्ता

'मतदारांच्या हितासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून केली होती. म्हणून मी पुन्हा शिवसेनेत आलो आहे', असं विलास तरे यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटलं. 

जनमतावर विशेष प्रभाव

बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार म्हणून आमदार विलास तरे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असून त्यांनी आपल्या कर्तृत्वानं जनमतावर विशेष प्रभाव निर्माण केलेला नसल्यानं त्यांना यावर्षी बविआकडून उमेदवारी नाकारण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळं विलास तरे शिवसेनेच्या संपर्कात होते.



हेही वाचा -

आर सीटी मॉलमध्ये ओपन होणार IKEAचं शॉप

महाराष्ट्राचे आरोपी, मनसेची भाजपच्या नेत्यांविरोधात पोस्टरबाजी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा