Advertisement

पांडुरंग फुंडकरांच्या जागेसाठी ३ ऑक्टोबरला मतदान

विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यांच्या माध्यमातून फुंडकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. २४ एप्रिल २०२० पर्यंत त्यांचं सदस्यत्व होतं. परंतु, ३१ मे २०१८ रोजी फुंडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून निवडून आलेल्या सदस्याचा कार्यकाल २४ एप्रिल २०२० पर्यंत राहील.

पांडुरंग फुंडकरांच्या जागेसाठी ३ ऑक्टोबरला मतदान
SHARES

राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या ३ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत याची घोषणा केली.
विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यांच्या माध्यमातून फुंडकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. २४ एप्रिल २०२० पर्यंत त्यांचं सदस्यत्व होतं. परंतु, ३१ मे २०१८ रोजी फुंडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून निवडून आलेल्या सदस्याचा कार्यकाल २४ एप्रिल २०२० पर्यंत राहील.

अर्ज दाखल करण्याची मुदत

या पोटनिवडणुकीसाठी १४ सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. २४ सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २६ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तीन ऑक्टोबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

भाजपचं बहुमत

विधानसभेत सध्या भाजपचं बहुमत आहे. विधानसभेत भाजपचे सदस्य सर्वात जास्त असल्यामुळे इतर कोणताही पक्ष या पोनिवडणुकीसाठी आपला उमेदवार देण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे. पर्यायाने भाजपामध्ये आता तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

हेही वाचा -

जमिनीशी नाळ जोडलेला लोकनेता!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा