Advertisement

महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, लवकरच जाहीर होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली

महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, लवकरच जाहीर होणार
SHARES

राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार आषाढी एकादशीनंतरच होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार 12 किंवा 13 जुलै रोजी होणार आहे, जे सरकार भाजप-शिवसेना युतीने अडीच वर्षांपूर्वी स्थापन करायला हवे होते, ते आता आम्ही केले आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. 5 वर्ष ज्यांनी खूप चांगले काम केले आहे. मध्यल्या काळात शेतकरी आणि जनतेच्या हितासाठी केलेल्या कामांना खंड पडला, तो आम्ही पुन्हा पुढे नेऊ."

शिंदे आणि फडणवीस यांनी मंत्रीपदासाठी कामगिरीचा फॉर्म्युला वापरण्याचे मान्य केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागीय निकषांसह मंत्री म्हणून कामाचा आवाका लक्षात घेऊन मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.

लोकसभेच्या निवडणुका अडीच वर्षांवर येत आहेत. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे मंत्र्यांना कमी वेळेत चांगली कामगिरी करावी लागते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आणि सामान्य प्रशासन कायम राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बहुतांश खाती भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेची खाती शिंदे गटाकडेच राहणार आहेत. शिंदे गटाला एकूण 12 ते 14 कॅबिनेट मंत्रीपदे मिळणार असून उर्वरित मंत्रिपदे भाजपकडे असतील.

गृहनिर्माण, वित्त नियोजन, महसूल, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण, कायदा आणि न्याय ही महत्त्वाची खाती भाजपकडे असण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडे नगरविकास, सामान्य प्रशासन, एमएसआरडीसी, उद्योग, कृषी, शिक्षण, उच्च तांत्रिक शिक्षण, समाजकल्याण, जलसंधारण, पाणीपुरवठा, पर्यावरण यासह काही महत्त्वाची खाती असतील.



हेही वाचा

maharashtra"="" target="_blank">Maharashtra Political Saga: हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंचे आवाहन">Maharashtra Political Saga: हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंचे आवाहन

संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट, किरीट सोमय्यांची माहिती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा