Advertisement

संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट, किरीट सोमय्यांची माहिती

त्याबद्दलची माहिती किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीटद्वारे दिली आहे.

संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट, किरीट सोमय्यांची माहिती
SHARES

मेधा किरीट सोमय्या मानहानी प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी आज अटक वॉरंट जारी केले आहे. याबाबतची माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. भारतीय दंडविधानातील कलम ४९९, ५०० अंतर्गत हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

शिवडी न्यायालयाने राऊत यांच्याविरोधात आज जामीनपात्र अटक वॉटंर जारी केले आहे. त्याबद्दलची माहिती सोमय्या यांनी आपल्या ट्वीटद्वारे दिली आहे.

या अटक वॉरंटमध्ये न्यायालयाने राऊत यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी न्यायालयाने मेधा यांच्या तक्रारीची दखल घेत राऊत यांना समन्स बजावून सोमवारी (४ जुलै) हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट बजावून १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता.

मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.



हेही वाचा

Maharashtra Political Saga: हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंचे आवाहन

किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट, शिंदे-भाजपमधील वाद उघड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा