Advertisement

नाराज वडेट्टीवारांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

दुय्यम खातं मिळाल्यानंतर वडेट्टीवार नाराज होते. खातेवाटपानंतर ते प्रतिक्रिया देण्यासही तयार नव्हते.

नाराज वडेट्टीवारांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी
SHARES

दुय्यम खातं मिळाल्याने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार प्रचंड नाराज आहेत. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून वडेट्टीवार यांनी आपली नाराजी दाखवून दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन खातं वडेट्टीवार यांना देण्यात आलं आहे. 

दुय्यम खातं मिळाल्यानंतर वडेट्टीवार नाराज होते. खातेवाटपानंतर ते प्रतिक्रिया देण्यासही तयार नव्हते. आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे लिहायचे ते लिहा अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.  विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.सत्ताबदलानंतर काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीतही त्यांचा समावेश करण्यात आला होता. वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष मागास प्रवर्ग कल्याणाची जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली. त्यामुळे चांगल्या खात्याची त्यांना अपेक्षा होती. 

मंत्रिमडळ विस्तारानंतर मंगळवारी होणाऱ्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला वडेट्टीवार हे हजर राहणार का, याकडं सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, विस्तारानंतरच्या पहिल्याच बैठकीला गैरहजर राहून वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.



हेही वाचा -

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा

काश्मीर तोडण्याची भाषा सहन करणार नाही- संजय राऊत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा