Advertisement

मी केंद्रातच ठीक, महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच नाही- नितीन गडकरी


मी केंद्रातच ठीक, महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच नाही- नितीन गडकरी
SHARES

महाराष्ट्रातील राजकीय पेच सुटण्यासाठी शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा राज्यातील सरकार बनेल, असं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी सकाळी केलं. शिवाय आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ही अफवा असल्याचा खुलासाही त्यांना केला.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपचं मौन, राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पाऊल?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला असला, तरी सत्ता विभाजनावरून निर्माण झालेला राजकीय पेच अजूनही सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याने हा पेच आता दिल्लीत जाऊन पोहोचला आहे. गडकरी यांनी मध्यस्ती केल्यास तोडगा निघू शकेल, त्याचप्रमाणे फडणवीस यांच्या जागी गडकरी महाराष्ट्रात परतल्यास शिवसेनेशी जुळवून घेता येईल, अशा चर्चाही रंगू लागल्या.

त्यासंदर्भात गडकरी यांना विचारलं असता, निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळालेल्या असल्याने भाजपचाच मु्ख्यमंत्री होईल. तसंच देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याने राज्यात त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल. सध्या आपण दिल्लीत असून राज्यात येण्याचा प्रश्नच नाही, असंही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीबाबत गडकरी म्हणाले की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचा संबंध राजकारणाशी जोडणे योग्यही नाही.'


हेही वाचा-

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपचं मौन, राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पाऊल?

मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम, आमदारांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय


 
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement