Advertisement

केबल व्यवसायावर गदा येऊ देणार नाही - राज ठाकरे

महाराष्ट्रातील केबल चालक, मालक आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे इतर कर्मचारी यांच्यामध्ये जिओ कंपनीच्या केबल व इंटरनेट क्षेत्रातील पदार्पणामुळे असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील ३००-४०० केबलचालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेच्या माध्यमातून कृष्णकुंज येथे सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

केबल व्यवसायावर गदा येऊ देणार नाही - राज ठाकरे
SHARES

तुमच्या व्यवसायावर मी कुठल्याही प्रकारची गदा येऊ देणार नाही. तसंच संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण  सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे, असं आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केबल-इंटरनेट मालकांसह कर्मचाऱ्यांना दिलं अाहे.


केबलचालक, मालक  कृष्णकुंजवर

महाराष्ट्रातील केबल चालक, मालक आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे इतर कर्मचारी यांच्यामध्ये जिओ कंपनीच्या केबल व इंटरनेट क्षेत्रातील पदार्पणामुळे असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. मालकांसह कर्मचारी वर्गाचा प्रश्न ऐरणीवर असून आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातून सुमारे ३००-४०० केबलचालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेच्या माध्यमातून कृष्णकुंज येथे सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मी तुमच्या पाठीमागे खंभीरपणे उभा आहे. तुमच्या व्यवसायावर कोणतीही गदा येऊ देणार नसल्याचं राज ठाकरे यांनी आश्वासन दिलं.   बैठकीवेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष परेश तेलंग, कार्याध्यक्ष दीपक देसाई सरचिटणीस तुषार आफळे आदी उपस्थित होते.


पत्राद्वारे साधला संवाद 

महाराष्ट्रातील केबल, इंटरनेट व्यवसायातील चालक, मालक व कर्मचाऱ्यांशी पत्राद्वारे राज ठाकरे यांनी संवाद साधून ‘चुकीचे धोरण राबवू नये’, असा इशारा रिलायन्सच्या जिओला दिला होता . तसंच जिओ कंपनीने महाराष्ट्रातील केबल चालक व मालक यांच्या व्यवसायावर कुठलीही गदा येईल, असं चुकीचं धोरण राबवू नये असा इशारा देऊन जिओ कंपनीने महाराष्ट्रातील केबल, इंटरनेट मालक व चालक यांना सोबत घेऊनच पुढील वाटचाल करावी, असं आवाहन देखील केलं होतं.




हेही वाचा -

गणेशोत्सव मंडळांसाठी अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे धाव

केरळला महाराष्ट्राकडून २० कोटींची मदत





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा