Advertisement

सिनेट निवडणूक: उमेदवारांना बोगस मतदानाची भीती


सिनेट निवडणूक: उमेदवारांना बोगस मतदानाची भीती
SHARES
Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकासाठी रविवारी मतदान होत आहे. पदवीधरच्या १० जागांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी ६२ हजार मतदार रिंगणात आहेत. तब्बल ८ वर्षांनी या निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीत बोगस मतदान होण्याची चिंता उमेदवारांकडून केली जात आहे. यातील बहुतांश मतदार मुंबई, ठाणे, रायगड येथील असल्याने बोगस मतदान रोखण्याची महत्त्वाची जबाबदारी मुंबई विद्यापीठासमोर असणार आहे.


मतदार यादीत घोळ

या निवडणुकीची माहिती सर्व मतदारापर्यंत पोहोचावी म्हणून मुंबई विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर मतदारांची यादी जहीर केली. या यादीत असंख्य घोळ असल्याने बोगस मतदार त्याचा फायदा घेऊ शकतात, असं उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्व मतदान केंद्रात आवश्यक पोलिस यंत्रणा लावण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.


सुविधा द्या

पोलिसांचं संख्याबळ कमी असल्यास बोगस मतदान होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देणं, मतदान केंद्रात उमेदवार प्रतिनिधी बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था करणं, मतदान प्रक्रिया सुरू होत असताना किंवा मतदान झाल्यावर मतपेटी सील करताना व्हिडिओ शुटींग काढण्यात यावी, विद्यापीठात किंवा मतदान केंद्रावर तक्रार निवारण करणारे सक्षम अधिकारी उपलब्ध करणं अशा सुविधांचीही विद्यापीठाने काळजी घ्यावी, अशा सूचना संघटनांकडून होत आहेत.


तयारी पूर्ण

बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी तयारी केल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. ५३ मतदान केंद्रांपैकी २ ते ३ मतदान केंद्रांसाठी एक निरीक्षक, २० ते २२ महाविद्यालयीन कर्मचारी, प्रत्येक केंद्रावर एक मतदान केंद्रप्रमुख अशी टीम तयार करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिल्याचं अभाविपने स्पष्ट केलं.


मतदान होत असताना मतदान केंद्रावर कुलगुरू, प्र. कुलगुरू, कुलसचिव यांनी भेट द्यावी. ही संपूर्ण निवडणूक निष्पक्षपणे, लोकशाहीच्या मार्गाने व पारदर्शी होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने त्वरित आवश्यक ते निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी.
- अनिकेत ओव्हाळ, प्रदेश मंत्री, अभाविपहेही वाचा-

सिनेट निवडणूक: पदवीधर मतदान केंद्राच्या शोधात

सिनेट निवडणुकीसाठी मुंबई विद्यापीठ सज्जसंबंधित विषय
Advertisement