काँग्रेसच्या कार्यसमितीची सोमवारी सात तास चाललेली बैठक वादळी ठरली. काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना काँग्रेस नेतृत्व आणि पक्षसंघटनेची पुनर्रचना करण्याची मागणी करणारे पत्र पाठवले होते. त्यावर या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या पुढील अधिवेशनापर्यंत हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील असे या बैठकीत ठरले आहे.