Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात तक्रार दाखल

राणेंच्या अटकेनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात तक्रार दाखल
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या विरोधात उत्तर प्रदेशामधील (uttar pradesh police) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे.

तर, बडनेराचे आमदार रवी राणा (ravi rana) यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत तक्रार दाखल केली आहे. ज्याप्रमाणे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी तक्रार अमरावती इथल्या राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक प्रकरणामुळे शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (bjp) आता वाद पेटला आहे.

राणेंच्या अटकेनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चपलेनं मारलं असतं, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाविरोधात उत्तर प्रदेशमधील आंबेडकरनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देवून गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे महामंत्री आणि ॲड. बाबा राम यादव यांनी ही तक्रार केली आहे.

तर दुसरीकडे, नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना "त्याच्याच चपला घेऊन त्यांचं थोबाड फोडावं" असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं.

कोणत्या मुख्यमंत्र्याबद्दल असं बोलणं योग्य नाही. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, अस आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचं म्हणणं आहे.



हेही वाचा

‘तुम्ही माझं काही करू शकणार नाही’, राणेंचं शिवसेनेला खुलं आव्हान

नारायण राणेंच्या जामिनानंतर राणे बंधूंनी दिला 'हा' इशारा..

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा