Advertisement

नारायण राणेंच्या जामिनानंतर राणे बंधूंनी दिला 'हा' इशारा..

सगळ्या घडामोडीनंतर स्वत: नारायण राणे आणि नितेश व निलेश राणे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्यक्त झाले आहेत.

नारायण राणेंच्या जामिनानंतर राणे बंधूंनी दिला 'हा' इशारा..
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं. या वक्तव्यानंतर नारायण राणेंना अटक झाली आणि नंतर जामिनावर सुटकाही झाली. या सगळ्या घडामोडीनंतर स्वत: नारायण राणे आणि नितेश व निलेश राणे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्यक्त झाले आहेत.

नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर इथं अटक केली. त्यानंतर घटना घडली त्या जिल्ह्यात म्हणजेच राणे यांना महाडमधील प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना रात्री उशीरा जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी साडेबारा वाजता ‘सत्यमेव जयते’ असं लिहिलेला एक फोटो ट्विट केला. 

त्यानंतर बुधवारी दुपारी पुन्हा एक ट्विट करत राणेंनी आपल्या समर्थकांचे आभार मानले. “कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार,” असं राणे यांनी म्हटलं आहे. यामाध्यमातून राणे यांनी जन आशिर्वाद यात्रेत पुन्हा सहभागी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा- झिशान सिद्दीकी बनले मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष

तर, दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर राजनिती या हिंदी सिनेमातील अभिनेता मनोज वाजपेयी यांची एक क्लिप टाकली आहे. त्यात मनोज वाजपेयी भाषण करताना “आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी,” असं म्हणताना दिसतो. तसेच पुढे तो, “करारा जवाब मिलेगा,” असा डायलाॅग म्हणताहेत. यातून नितेश राणे यांनी जशास तसं उत्तर देण्याचा अप्रत्यक्ष इशारा शिवसेनेला दिला आहे.

सोबतच, काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचा मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली??, असं भाष्य भाजप नेते निलेश राणे यांनी केलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा