Advertisement

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०००० दंड

चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०००० दंड
SHARES

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगानं आता अनिल देशमुख यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. हा दंड मुख्यमंत्री मदत निधीत जमा केला जाणार आहे.

चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सचिन वाझेच्या बद्दल क्रॉस एक्झामिनेशनसाठी वकिलाच्या अनुपस्थितीमुळे हा दंड ठोठवला गेला आहे.

या अगोदर सप्टेंबर महिन्यात वसुलीचा आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

परमबीर सिंग हे आयोगासमोर उपस्थित राहत नाही त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागत आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे असे आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी म्हटले होते. यावर आयोगाने परमबीर सिंग यांना ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये या आयोगाची स्थापना केलेली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा