भाऊंना धक्का देत दादा दुस-या स्थानी

 Pali Hill
भाऊंना धक्का देत दादा दुस-या स्थानी
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का देत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाचं स्थान प्राप्त केलंय. मंत्रिमंडळात एकनाथ खडसेंना दुसरे स्थान होते. मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असलेले खाते बघता त्यांना दुसरे स्थान देण्यात येईल असे सांगितले जात होते. मात्र या जागेवर आता अधिकृतरित्या चंद्रकांत पाटील यांना स्थान देण्यात आलंय. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा देण्यात आली. राज्य सरकारनं या संदर्भात तसा शासकिय निर्णय जारी केलाय.

Loading Comments