SHARE

देशात अाणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारनं मराठा समाजाला अारक्षण देण्यासाठी राज्यघटनेत बदल करावेत. त्यासाठी मी विरोधकांशी बोलण्यासाठी तयार अाहे. मराठा अारक्षणासाठी माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं अाहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना अाम्ही मराठा समाजाला अारक्षण दिलं होतं. मात्र कोर्टानं ते अारक्षण रद्द केलं, असंही शरद पवार यांनी सांगितलं.


सत्ताधारी अागीत तेल अोतताहेत

सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारी वक्तव्य ही आगीत तेल ओतण्याचं काम करत अाहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानांमुळे आंदोलन चिघळलं. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात मराठा आरक्षणचा निर्णय घेतला गेला, पण कोर्टात तो रद्द झाला. तोपर्यंत आचारसंहिता लागली होती. त्यानंतर देशात अाणि राज्यात भाजपचं सरकार आलं.


धनगर समाजालाही निराश केलं

भाजप सरकारनं धनगर व मराठा समाजाला आरक्षण देणार, असं आश्वासन दिलं होतं. परंतु सरकारनं त्यांनाही निराश केलं. याच कारणास्तव हे आंदोलन चिघळत अाहे. भाजप सरकार फक्त अाश्वासनांचं गाजर दाखवत अाहे. भाजप सरकारनं आता घटनेत किरकोळ बदल करून आरक्षणाचा निर्णय घ्यावा. याबाबत मी विरोधकांशी बोलेन. या सर्वाला अामच्या पक्षाचा पाठिंबा राहील, अशी टीकाही पवार यांनी केली.


चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. मी १४ वेळा निवडणूक लढवून निवडून अालो. चंद्रकांत पाटील यांनीही जनतेतून निवडून यावं. तसंच निवडणूक आली की पवारांना जात आठवते, या चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचाही त्यांना समाचार घेतला. भाजप सरकार राफेल प्रकरणाविषयी जनतेपासून काही लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.


सर्वपक्षीय बैठक

सध्या मराठा अारक्षणाचा प्रश्न चिघळला असून अाजही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी अांदोलन केलं. यावर तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या