प्रभाग आरक्षणाचा घोसाळकरांना फटका

Pali Hill
प्रभाग आरक्षणाचा घोसाळकरांना फटका
प्रभाग आरक्षणाचा घोसाळकरांना फटका
See all
मुंबई  -  

दहिसर - पालिका निवडणुकीसाठीचे अारक्षण आणि प्रभाग पुर्नरचनेमुळे आर उत्तर विभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रभाग आरक्षणाचा फटका

प्रभाग क्र 1 मधील शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना बसला आहे. घोसाळकरांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. प्रभाग क्र 2, 3 आणि 8 पुरुषांसाठी खुले असतील. तर प्रभाग क्र 4 आणि 6 ओबीसी महिला तर प्रभाग क्र 5 ओबीसी पुरुष आणि आर
घोसाळकरांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने येथून कमलाकर पाटील यांची सून दीपा पाटील यांना शिवसेना उमेदवारी देऊ शकते. प्रभाग क्र 2 खुला असून येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांना संधी मिळू शकते. तर काँग्रेस भवर कुमावत यांना संंधी देऊ शकते. प्रभाग क्र. 3 सुद्धा पुरुषांसाठी आरक्षित असून, येथून शिवसेना बाळू ब्रिज यांना तर काँग्रेस अभय चौबे यांना तिकीट देऊ शकते.
प्रभाग क्र 4 ओबीसी महिलांसाठी आरक्षित असून, येथून विद्यमान नगरसेवक उदेश पाटेकर यांची पत्नी सुजाता पाटेकर यांना शिवसेना संधी देऊ शकते.
प्रभाग क्र. 5 ओबीसी पुरुषांसाठी आरक्षित असून येथून अशोक नर यांचा मुलगा जयेश नर यांना शिवसेनेकडून तिकीट मिळू शकते. तर काँग्रेसकडून अॅड. संदेश कोंडविलकर यांना संधी मिळू शकते. प्रभाग क्र 6 ओबीसी महिलांसाठी आरक्षित असून, येथून शिवसेनेच्या शितल म्हात्रे प्रबळ दावेदार आहेत. प्रभाग क्र. 7 खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून, माजी महापौर शुभा राऊळ येथून निवडणूक लढवू शकतात. तर प्रभाग क्र 8 खुला असून येथून शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर निवडणूक लढवू शकतात.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.