Advertisement

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर कडधान्य उधळले, १० जणांना अटक


मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर कडधान्य उधळले, १० जणांना अटक
SHARES

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी 'छावा युवा महासंघ संघटने'च्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तूर, हरभरा, मूग कशी कडधान्य उधळून सरकारचा निषेध केला.

'छावा युवा महासंघा'चे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मंत्रालय परिसरात ५० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यांत १० महिलांचा समवेश आहे. आंदोलन करताना पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले असून त्यात ३ महिलांचाही समावेश आहे.




शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचं आश्वासन देऊनही सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. सदाभाऊ खोत यांच्यासोबत १५ दिवसांपूर्वी हमीभावासंदर्भात बैठक झाली होती, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून आम्हाला आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन करावं लागलं आहे.
- धनाजी येळकर, अध्यक्ष, छावा युवा महासंघ



हेही वाचा-

'आयुष्यमान भारत योजना' म्हणजे गरिबांची थट्टा- अशोक चव्हाण

शरद पवार खोटारडे- प्रकाश आंबेडकर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा