Advertisement

शरद पवार खोटारडे- प्रकाश आंबेडकर

वार यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही. कारण अकोल्यातील निवडणुकीत पवार यांचा उमेदवार माझ्या विरोधात उभा होता. पवार यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका करू नये. उलट त्यांनी प्रमोद महाजन यांना त्यांच्या जागेवर तिकीट का दिलं? याचा खुलासा करावा, असं म्हणत आंबेडकर यांनी पवारांना आव्हान दिलं.

शरद पवार खोटारडे- प्रकाश आंबेडकर
SHARES

मी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने खासदार झालो हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दावा तद्दन खोटा असून पवारांइतकं खोटं कुणी बोलत नसेल, असं म्हणत भारिप-बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पवार यांनी केलेला दावा खोडून काढला. सोमवारी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


काय म्हणाले आंबेडकर?

तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी माझ्या खासदारकीच्या जागेबाबत समझोता झाला होता. सीताराम केसरी यांच्यात आणि आमच्यात ४ जागांचा समझोता झाला होता. त्यात शरद पवार नव्हते. पवार यांची मला भेटण्याची इच्छा असल्याची बाब मुरली देवरा यांनी सांगितली. तेव्हा राजगृहावर झालेल्या भेटीत या करारात मला यायचं आहे, असं पवार मला म्हणाले.


महाजनांना तिकीट का दिलं?

सन १९९९ च्या निवडणुका झाल्या, तेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यामुळे पवार यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही. कारण अकोल्यातील निवडणुकीत पवार यांचा उमेदवार माझ्या विरोधात उभा होता. पवार यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका करू नये. उलट त्यांनी प्रमोद महाजन यांना त्यांच्या जागेवर तिकीट का दिलं? याचा खुलासा करावा.

आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. काँग्रेसने स्थानिक पक्षांना विचारात घेऊन निवडणुका लढवाव्यात. राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी केल्यावर राष्ट्रवादीसमोर उमेदवार उभा करायचा किंवा नाही हे त्याचवेळेच ठरवू, असंही आंबेडकर म्हणाले.



हेही वाचा-

आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये- शरद पवार

मुख्यमंत्री तपासणार मंत्र्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा