Advertisement

JNU Protest: महकवर नोंदवलेला गुन्हा दुर्दैवी- भुजबळ

‘फ्री काश्मीर’चा फलक झळकावणारी तरूणी महक मिर्झा प्रभू हिच्यावर कुलाबा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

JNU Protest: महकवर नोंदवलेला गुन्हा दुर्दैवी- भुजबळ
SHARES

मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया इथं झालेल्या आंदोलनादरम्यान ‘फ्री काश्मीर’चा फलक झळकावणारी तरूणी महक मिर्झा प्रभू हिच्यावर कुलाबा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी कुलाब्यातील गेट वे आॅफ इंडिया इथं विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन केलं. या आंदोलनात महक प्रभू हिने ‘फ्री काश्मीर’चा फलक झळकावला होता. यामुळे हे आंदोलन फुटरतावाद्यांच्या पाठिंब्यावर सुरू असल्याचा आरोप भाजपने केला होता. यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात हलवल्यावर हे आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलं.

हेही वाचा- JNU Protest: सोमय्यांच्या अंगात इंग्रजांचं रक्त, अबू आझमींचा टोला

त्यानंतर कुलाबा पोलिसांनी ३१ जणांविरोधात बेकायदेशीररित्या जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. तर महकविरोधात भा. दं. वि. संहितेच्या कलम १५३ (बी) अन्वये धार्मिक, वांशिक, प्रादेशिक, जातीय गट निर्माण करून एकोपा टिकण्यास बाधित होईल, असं कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

त्यावर प्रतिक्रिया देताना, काश्मीरमध्ये इंटरनेटसह सर्व संवादमाध्यमे बंद आहेत. ही संपर्कमाध्यमे सुरू करून काश्मीरमधील रहिवाशांना इतरांप्रमाणे मुक्तपणे संवाद साधू द्या, असं महक म्हणत होती. त्याला आझाद काश्मीरच्या घोषणेशी जोडणं ही पोलिसांची चूक आहे, असं भुजबळ म्हणाले.

तर, दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस महक चौकशी करतील व या चौकशीत काही तथ्य न आढळल्यास ते गुन्हा मागे घेतील, असं सांगितलं. 

हेही वाचा- ‘फ्री काश्मिर पोस्टर’ झळकवल्या प्रकरणी चौकशी करू- अनिल देशमुख

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा