Advertisement

JNU Protest: सोमय्यांच्या अंगात इंग्रजांचं रक्त, अबू आझमींचा टोला

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या शरीरात इंग्रजांचं रक्त असल्याची टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केली.

JNU Protest: सोमय्यांच्या अंगात इंग्रजांचं रक्त, अबू आझमींचा टोला
SHARES

जेएनयूमधील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया इथं एकवटलेल्या विद्यार्थ्यांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचं समर्थन करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या शरीरात इंग्रजांचं रक्त असल्याची टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केली. 

हेही वाचा- CAA विरोधात दीर्घकालीन लढ्याची गरज - प्रकाश आंबेडकर

मुंबई महापालिका वाॅर्ड क्रमांक १४१ पोटनिवडणुकीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काही विद्यार्थी गेट वे आॅफ इंडिया इथं जमले होते. यापैकी ३१ जणांविरुद्ध कुलाबा पोलिस ठाण्यात बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच या आंदोलनादरम्यान महक मिर्झा प्रभू या तरुणीने ‘फ्री काश्मीर’ पोस्टर झळकावल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत आला होता. त्यामुळे कुलाबा पोलिसांनी महक विरोधात १५३ ब म्हणजेच निरनिराळा धार्मिक, वांशिक, प्रादेशिक, जातीय गट निर्माण करून त्याद्वारे एकोपा टिकण्यास बाधित होईल असं कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या आंदोलनात सहभागी झालेले महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसंच काश्मीरच्या आझादीचे नारे देणाऱ्या आंदोलकांविरोधात कुलाबा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या अटकेचं त्यांनी समर्थन केल्यावर सोमय्या यांच्या अंगात इंग्रजांचं रक्त असून पोलिसांनी निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नयेत, अशी प्रतिक्रिया आझमी यांनी दिली. 

हेही वाचा- मनसेच्या महाअधिवेशनात ‘राज’पुत्राचं अधिकृत पदार्पण?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा